Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.

Updated: Dec 31, 2022, 07:15 PM IST
Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन  title=

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : फिफा वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता क्रिस्टियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) मोठी लॉटरी लागली आहे. सौदी अरेबियाच्या अल नासर (Al Nassr) फुटबॉल क्लबने रोनाल्डोशी करार केला आहे. या क्लबने कराराबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. 

अल नासरच्या पोस्टमध्ये काय? 

क्रिस्टियानो रोनाल्डोशी (Cristiano Ronaldo) करार केल्यानंतर अल नासरने (Al Nassr) ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोनाल्डोचे निळे आणि पिवळे शर्ट घातलेले फोटो पोस्ट केले आहेत. या शर्टच्या पाठीमागे 7 क्रमांक छापलेला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहले की,"हे घडवण्यात इतिहासापेक्षाही अधिक आहे. ही एक स्वाक्षरी आहे जी केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमची लीग, आमचा देश आणि पुढच्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना देखील प्रेरणा देईल.ख्रिस्तियानो रोनाल्डोचे तुमच्या नवीन घरात, अल नासरमध्ये स्वागत आहे, असे त्यांनी म्हटलेय. 

इतक्या कोटींना खरेदी

क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) अखेर सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्लबशी करार केला आहे. हा करार 200 दशलक्ष युरो (सुमारे 1775 कोटी रुपये) मध्ये पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. या करारानंतर तो जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  

अडीच वर्षांचा करार 

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.

पोर्तुगालसाठी बेंच झाल्यानंतर आणि मँचेस्टर युनायटेडमधून काढून टाकल्यानंतर रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आता गल्फमध्ये खेळणार आहे.रोनाल्डोचा त्याच्या माजी क्लब मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपल्यानंतर त्याच्या भवितव्याबद्दल बरीच अटकळ बांधली जात होती, जी रोनाल्डोने आता संपवली आहे.