चेन्नई : महेंद्र सिंह धोनी त्याच्या कूल स्वभावासाठी ओळखला जातो. मॅचदरम्यान कितीही गंभीर परिस्थिती असो, परंतू धोनी संयम सोडत नाही. पण पंजाब विरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचदरम्यान धोनी बॉलर दीपक चहरवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
MS Dhoni schooling Deepak Chahar for his back to back no balls #CSKvKXIP #IPL2019 pic.twitter.com/iRhGQ62gib
— Deepak Raj Verma (@DeVeDeTr) April 6, 2019
पंजाबला विजयासाठी चेन्नईने १६१ रनचे आव्हान दिले होते. पंजाबला अखेरच्या २ ओव्हरमध्ये ३९ रनची गरज होती. त्यावेळी धोनीने दीपक चहरला बॉलिंगसाठी बोलावले. दीपक चहरने आपल्या बॉलिंगदरम्यान सलग २ नो बॉल टाकले. त्यामुळे धोनी मैदानातच भडकला आणि धोनीने चहरच्या दिशेने जात त्याला भरमैदानात सर्वांसमोर चांगलेच सुनावले. कोणत्या दिशेला बॉलिंग करावी याचे धडे धोनीने चहरला दिले. धोनीने सांगितलं आणि अपयशी ठरलं, असं शक्यच नाही.
धोनीने सुनावल्यानंतर त्वरित फायदा झाल्याचे मिळालं. दीपक चहरने पंजाबच्या डेव्हिड मिलरला बोल्ड केले. या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चेन्नईने ठेवलेल्या १६१ रनच्या आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या पंजाबची निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या २ विकेट स्वस्तात गमावल्यानंतर सरफराज खानच्या जोडीने सलामीवीर केएल राहुलने पंजाबचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११७ रनची शतकी पार्टनरशिप केली.
पंजाबकडून सरफराज खानने सर्वाधिक ६७ तर लोकेश राहुलने ५५ रनची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीनंतर देखील पंजाबला विजयी होता आले नाही. चेन्नईकडून हरभजन आणि स्कॉट कुगेलिनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर दीपक चहरने १ विकेट घेत चांगली साथ दिली.