IPL 2019 : ...म्हणून सुरुवातीच्या मॅच जिंकण्यासाठी रोहित आग्रही

 मुंबईने ३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

Updated: Apr 7, 2019, 05:28 PM IST
IPL 2019 : ...म्हणून सुरुवातीच्या मॅच जिंकण्यासाठी रोहित आग्रही  title=

हैदराबाद : मुंबईने शनिवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ४० रनने पराभव केला. मुंबईने केवळ हैदराबादचा पराभवच केला नाही तर, त्यांच्या विजयी घोडदौडीला विराम लावला. यामुळे मुंबईने ३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 'आम्ही आयपीएलच्या सुरुवातीपासून विजयासाठी आग्रही होतो'. अशी प्रतिक्रिया कॅप्टन रोहित शर्माने मॅचनंतर दिली. 

रोहित म्हणाला की, 'सुरुवातीपासूनच जर आम्ही मॅच जिंकलो तर आयपीएलच्या बाद फेरीसाठी पात्र ठरु. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी काही खेळाडू मायदेशात परततील. यामुळे आम्ही सुरुवातीच्या मॅच जिंकण्यासाठी आग्रही आहोत. परदेशी खेळाडू वर्ल्ड कपच्या तयारीसाठी गेल्यावर आयपीएलच्या शेवटच्या सत्रामध्ये जिंकणं कठीण होईल'.  

आगामी ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपला ३० मे पासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपची तयारी म्हणून मुंबईचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा श्रीलंकेत स्थानिक वनडे स्पर्धा खेळण्यासाठी रवाना झाला आहे. 

आयपीएलमध्ये निराशाजनक सुरुवात करणारी टीम अशी मुंबईची ओळख करुन द्यायची नाहीये. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये टीममध्ये मलिंगाच्या जागी अल्झारी जोसेफला संधी दिली. त्यानेही संधीचे सोने केले. जोसेफने ३.४ ओव्हरमध्ये १२ रन देत ६ विकेट घेतल्या. त्यातही १ ओव्हर मेडन टाकली. मुंबईने हैदराबादला विजयासाठी १३७ माफक आव्हान दिले होते. पंरतू जोसेफच्या बॉलिंगमुळे मुंबईला ४० रनने विजय मिळवता आला.

कॅप्टन रोहितने जोसेफच्या या कामगिरीचे कौतुक केले. 'आपल्या पदार्पणातील मॅचमध्ये अशी विजयी कामगिरी करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. जोसेफने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याच्या आत्मविश्वासात भर पडली आहे'. मुंबईची पुढची मॅच १० एप्रिलला पंजाबविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.