धोनी पुन्हा बनला भारताचा कर्णधार

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Updated: Sep 25, 2018, 05:01 PM IST
धोनी पुन्हा बनला भारताचा कर्णधार title=

दुबई : आशिया कप 2018 मध्ये आजचा सामना खूपच मजेदार असणार आहे. कारण अफगानिस्तान ज्यांचं होमग्राउंड भारत आहे ते भारतीय टीम विरोधात सामना खेळणार आहे. पण भारतीय चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी कर्णधार असणार आहे. अफगानिस्तानने टॉस जिंकल्यानंतर आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

696 दिवसानंतर धोनी बनला कर्णधार 

महेंद्र सिंह धोनी आज कर्णधार म्हणून 200वा वनडे सामना खेळतो आहे. रोहित शर्माला विश्रांती दिल्यामुळे धोनी आज भारताचा कर्णधार असणार आहे. 696 दिवसानंतर धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमचा कर्णधार बनला आहे. सोबतच युवा भारतीय गोलंदाज दीपक चाहर वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू करत आहे. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी त्याला वनडे कॅप दिली.

विजयाचा सिलसिला कायम ठेवणार भारत

आशिया कपमध्ये सर्वात कमजोर समजली जाणारी टीम अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि बांगलादेशला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे भारतासाठी देखील हा सामना जिंकणं सोपं असेल असं म्हणता येणार नाही. भारत विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या सामन्यात विजयासह भारत फायनलमध्ये सकारात्मकेते प्रवेश करेल. आजच्या सामन्यात अफगाणिस्तान जिंकली तरी काहीही फरक पडणार नाही. कारण अफगाणिस्तान स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे.