मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांने आणखी एक विक्रम केला आहे. लॉर्ड्च्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध खेळत असतांना दूसऱ्या वनडेमध्ये त्याने उमेश यादवच्या बॉलवर जॉस बटलरचा कॅच घेत 300 कॅच पकडण्याचा विक्रम केला आहे. असं करणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे. 320 व्या सामन्यात धोनीने 107 स्टंपिंग देखील केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 407 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीने 90 सामन्यांमध्ये 256 कॅच तर 38 स्टंपिंग केल्या आहेत.
वर्ल्ड रेकॉर्डबाबत बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट या यादीत पहिल्या स्थानावर आहे. गिलक्रिस्टने 287 वनडे सामन्यांमध्ये 472 विकेट्स घेतले आहेत. ज्यामध्ये त्याने 417 कॅच आणि 55 स्टंपिंग केले आहेत. या यादीत मार्क बाउचर दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने 295 सामन्यांमध्ये 402 कॅच घेतले आहेत. कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या या विकेटकीपरने 404 सामन्यांमध्ये 383 कॅच घेतल्या आहेत. भारताची माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत आता चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय विकेटकीपरमध्ये धोनीनंतर एनआर मोंगियाचं नाव येतं ज्याने 140 सामन्यांमध्ये 110 कॅच आणि 44 स्टंपिंग केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहे ज्याने 72 कॅच आणि 14 स्टंपिंग केल्या आहेत.
धोनी टी20 क्रिकेटमध्ये 50 कॅच घेणारा पहिला विकेटकीपर आहे. 93 टी20 अंतरराष्ट्रीय सामने आतापर्यंत धोनी खेळला आहे. दूसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा दिनेश रामदीन आहे ज्याने 34 कॅच पकडले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकने 30 कॅच पकडले आहेत.
1. अॅडम गिलक्रिस्ट: 472
2. मार्क बाउचर: 402
3. कुमार संगकारा: 383
4. एमएस धोनी: 300
5. ब्रेंडन मॅकलम: 227
6. मोईन खान: 214
7. इयान हिली: 194
8. जेफ डुजॉन: 183
9. राशिद लतीफ: 182
10. दिनेश रामदीन: 181