Gautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य!

Gautam Gambhir Reacion on MS Dhoni :  भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 3, 2023, 04:15 PM IST
Gautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य! title=

Gautam Gambhir Reacion on MS Dhoni : सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना पावसाने धुवून निघाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही टीम्सला एक - एक पॉईंट वाटून देण्यात आला. दरम्यान या सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खेळ

भारत-पाकिस्तान ( India - Pakistan ) सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय टीम इंडियासाठी जास्त फायदेशीर ठरलेला दिसला नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेली. यावेळी टीम इंडिया ( Team India ) अवघे 266 रन्स करू शकली. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानच्या टीमला फलंदाजीची संधी मिळाली नाही. दरम्यान याचवेळी गौतम गंभीरने एशिया कपच्या जुन्या सामन्याच्या आठवणींना उजाळा देत धोनीचीही आठवण काढलीये.

'धोनी किंवा मी सामना जिंकवून दिला नव्हता'

या सामन्यात कमेंट्री करताना गंभीरने ( Gautam Gambhir ) एशिया कप-2010 मध्ये डंबुला याठिकाणी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भाष्य केलं. गंभीर म्हणाला, 'तो सामना मी जिंकवला नाही. तो सामना हरभजन सिंगने जिंकवून दिला होता. माझ्या आणि धोनीमध्ये ( MS Dhoni ) चांगली पार्टनरशिप झाली होती. मात्र मला वाटतं की, शेवटचा रन जो घेतो तो सामना जिंकवतो. 

गंभीर ( Gautam Gambhir ) पुढे म्हणाला, त्या सामन्यामध्ये परिस्थिती चांगली नव्हती. त्यावेळी लाईट्स देखील चांगले नव्हते. आमच्यासमोर शोएब अख्तर, अब्दुल रझाक, सईद अजमल असं गोलंदाज होते.

हरभजनने लगावली होती सिक्स

2010 च्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा भारताकडून दारूण पराभव केला होता. त्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 267 रन्स केल्या. याच सामन्यात गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) 83 आणि धोनीने 56 रन्स केले होते. मोहम्मद अमीरने पाकिस्तानसाठी शेवटची ओव्हर टाकली होती. तेव्हा हरभजनने पाचव्या बॉलवर शानदार सिक्स ठोकला होता. अखेर भारताने हा सामना 3 विकेट्सने जिंकला.