IPL 2021: सराव सामन्यात स्टम्पच्या मागे आणि पुढे दिसला धोनीचा जलवा

धोनीचे सराव सामन्यादरम्यान जबरदस्त शॉट

Updated: Apr 7, 2021, 11:18 PM IST
IPL 2021: सराव सामन्यात स्टम्पच्या मागे आणि पुढे दिसला धोनीचा जलवा

चेन्नई : आयपीएल 2021 (IPL 2021) ची सुरुवात काही तासांवर आली आहे. सगळ्याच टीम आता यंदाचा खिताब जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मैदानावर प्रॅक्टीस मॅच सुरु आहेत.

चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) चौथ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकण्यासाठी सज्ज आहे. मागच्या सीजनमध्ये टीमला काही खास कामगिरी करता आली नव्हती.

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या तयारीसाठी सुरु असलेल्या सराव सामन्या दरम्यान चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings)चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) जोरदार शॉट खेळले. 

धोनीने (MS Dhoni) स्टंप्सच्या मागे आणि पुढे शानदार कामगिरी केली. विकेटकीपिंग आणि बॅटींग या दोन्हीमध्ये त्याने शानदार कामगिरी केली.