दाम्बुला : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गुरुवारी वनडे एक्सपर्टसोबत भरपूर सराव केला. या दरम्यान धोनीसह केदार जाधव, मनीष पांडे, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने देखील सराव केला. आकर्षणाचा केंद्र अर्थातच धोनी होता कारण धोनी त्याच्या भविष्या बद्दल नेहमी चर्चेत असतो. त्याने मैदानावर भारतीय आणि श्रीलकेंच्या बॉलर्सचा सामना केला.
धोनीने एक महिना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने भरपूर सराव करुन फास्ट बॉलर आणि स्पिनर बॉलर्सच्या विरोधात चांगल्या कामगिरीसाठी मेहनत घेतली. या दरम्यान त्याने काही आकर्षक शॉट्स देखील खेळले. प्रसादने अनेकदा धोनीचा बचाव केला आहे. ३५ वयानंतर पण खेळाडू चांगला खेळू शकतो हे त्याने सांगितलं.
धोनीने इंग्लंड विरोधात कटकमध्ये युवराज सिंगसोबत चांगली बॅटींग केली होती. दोघांनी शतक देखील केलं होतं. धोनीने ओव्हलमध्ये चँपियंस ट्रॉफीदरम्यान श्रीलंकेच्या विरोधात चांगली खेळी करत टीमचा स्कोर 300 पार नेला होता. पण वेस्टइंडिजच्या विरोधात तो इतकी चांगली कामगिरी नाही करु शकला.
धोनीने त्याचं फिटनेस देखील चांगलं ठेवलं आहे. विकेटकिपर म्हणून तो नेहमीच चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनीच्या खेळीकडे लक्ष असणार आहे.