मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या विकेटकीपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. विकेटकीपिंगमध्ये अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले आहेत. धोनीने शनिवारी एबी डिविलियर्सला खूपच शानदारपणे स्टपिंग करत आऊट केलं. डिविलियर्सने 3 बॉलमध्ये 1 रन केला. हरभजन सिंगच्या बॉलवर धोनीने डिविलियर्सला माघारी पाठवलं. डिविलियर्स या विकेटमुळे चेन्नईला नक्कीच विजय सोपा झाला. या 35 व्या सामन्यामध्ये चेन्नईने बंगळुरुवर विजय मिळवला.
Stumping alert: MSD at work https://t.co/ZjOUaFiIVK
— shailesh Musale (@shailesh_musale) May 5, 2018
चेन्नईने टॉस जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आधी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगळुरुने 9 विकेट गमवत 127 रन केले होते. पार्थिव पटेलने सर्वाधिक 53 रन केले. पटेलने 41 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्स ठोकत चांगली खेळी केली. टिम साउदीने बंगळुरुकडून 26 बॉलमध्ये 36 रन केले.