IND vs WI: सामना जिंकण्यासाठी शुभमन गिलने केली चिटिंग? थर्ड अंपायरने केली अशी पोलखोल!

Shubman Gill Cheat In IND vs WI 2nd T20: हेटमायरच्या बॅटला कट लागला अन् बॉल थेट स्लीपला थांबलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यावेळी शुभमन गिलकडून चूक झाली. बॉल थोडा पुढे पडला अन् थर्ड अंपायरने शिमरनला नॉट आऊट जाहीर केलं. 

Updated: Aug 7, 2023, 12:23 AM IST
IND vs WI: सामना जिंकण्यासाठी शुभमन गिलने केली चिटिंग? थर्ड अंपायरने केली अशी पोलखोल! title=
Shubman Gill Cheat, drop catch IND vs WI

Shubhman Gill, IND vs WI:  पाच टी-ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेट (West Indies Beat India by 2 wickets ) राखून पराभव केला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने (India vs West Indies) मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 152 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजने 8 गडी गमावून 155 धावा केल्या आणि सामना खिश्यात घातला आहे. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांना टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. या सामन्यात टीम इंडिया युवा खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) याने एक चूक केली आणि संपूर्ण सामन्याचा निकालच फिरला.

शुभमन गिलने चिटिंग केली? 

वेस्ट इंडिजच्या 11 व्या ओव्हरची जबाबदारी रवी बिश्नोईला देण्यात आली होती. त्यावेळी या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर नवा कोरा फलंदाज शिमरॉन हेटमायर मैदानात आला होता. त्यावेळी तो केवळ 1 धावावर खेळत होता. बिश्नोईला त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. हेटमायरच्या बॅटला कट लागला अन् बॉल थेट स्लीपला थांबलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यावेळी शुभमन गिलकडून चूक झाली. बॉल थोडा पुढे पडला अन् थर्ड अंपायरने शिमरनला नॉट आऊट जाहीर केलं.

ग्राऊंड अंपायरने हेटमायरला आऊट दिलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने रिव्ह्यु घेतला. थर्ड अंपायरने जेव्हा कॅच चेक केला. त्यावेळी बॉल थोडा पुढे टप्पा पडलेला दिसला. त्यावेळी त्याला नॉट आऊट जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता शुभमनवर टीका होताना दिसते. नॉट आऊट असल्याचं माहित असताना देखील शुभमनने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्याने त्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. खेळाडू वृत्तीवर टिकवणं गरजेचं आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी सुनावलंय.

भारत (प्लेइंग इलेव्हन): 

इशान किशन (WK), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.

आणखी वाचा - IND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने पराभव!

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): 

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.