इतक्या कोटींना विकला गेला दिनेश कार्तिक, किंमत ऐकून सगळेच झाले हैराण

आयपीएसच्या 2018 च्या लिलावाला आज सुरुवात झाली. यामध्ये अनेक खेळाडूंना कोटींमध्ये खरेदी केलं गेलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 27, 2018, 05:14 PM IST
इतक्या कोटींना विकला गेला दिनेश कार्तिक, किंमत ऐकून सगळेच झाले हैराण title=

बंगळुरु : आयपीएसच्या 2018 च्या लिलावाला आज सुरुवात झाली. यामध्ये अनेक खेळाडूंना कोटींमध्ये खरेदी केलं गेलं आहे.

कोणत्या टीममधून खेळणार?

भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकला आयपीएलच्या लिलावामध्ये 7.40 कोटींना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलं आहे. कार्तिक मागच्या सीजनमध्ये गुजरात लायन्सकडून खेळला होता.

साहा जखमी झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शेवटच्या टेस्ट मॅचसाठी त्याची निवड झाली होती. पण पार्थिव पटेलला अंतिम 11 मध्ये संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजचा देखील तो भाग असणार आहे.

आयपीएलमधला प्रवास

आयपीएलमध्ये कार्तिकचा प्रवास दिल्ली डेयरडेविल्सलोबत सुरु झाला. दूसऱ्या सीजनमध्ये खालच्या क्रमवारीत येऊन देखील त्याने चांगली कामगिरी केली. 2012 मध्ये कार्तिक मुंबईचा भाग झाला. 2014 मध्ये त्याची टीम इंडियामध्ये वापसी झाली. आयपीएलच्या लिलावात 2014 मध्ये दिल्लीने परत त्याला 12.5 कोटींना खरेदी केलं. आयपीएल 2015 मध्ये दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 कोटी 50 लाखांना खरेदी केलं. 2016 मध्ये कार्तिकला 2 कोटी 30 लाखाला गुजरात लायंसने खरेदी केलं.