म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज

नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.

Updated: Jun 29, 2017, 10:34 PM IST
म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज title=

नवी दिल्ली: नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करत असायचा तेव्हा माझ्या कार्यक्रमाचा टीआरपी कमी असायचा असंही एकता म्हणाली आहे.

क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कहानी घर घर की या कार्यक्रमांवेळी जर सचिन बॅटिंग करत असेल तर हमखास टीआरपी कमी मिळायचा अशी प्रतिक्रिया एकतानं दिली आहे. एकता तिचा आगामी कार्यक्रम 'कुंडली भाग्य'च्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये आली होती.

वडिल जितेंद्र यांना माझा शो करण्यासाठी अनेकवेळा आग्रह केला पण सध्या त्यांची स्क्रीनवर कमबॅक करण्याची इच्छा नसल्याचंही एकता म्हणाली आहे. स्क्रीनवर जितेंद्र दिसत नसले तरी रियल इस्टेट बिजनेसमध्ये ते सक्रीय असल्याचं एकतानं सांगितलं आहे.