लॉर्ड्स : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (Eng vs Ind 2nd Odi) हा गुरुवारी 14 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे पाच वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (eng vs ind 2nd odi prediction team india has golden chance win to series against england at lords cricket ground)
त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून लॉर्ड्सवर ऐतिहासिक मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्न इंग्लंडचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकूण 104 वनडे मॅच खेळवण्यात आल्या आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 56 सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 43 वेळा मात केली आहे. त्यामुळे आकडेवारीच्या बाबतीत टीम इंडियाचं वरचढ आहे.
पहिल्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ही जोडी टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. या दोघांनी टीम इंडियाला सहजासहजी विजय मिळवून देण्यात महत्तवपूर्ण वाटा उचलला होता. त्यामुळे या दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला जोरदार मुसंडी मारत मालिकेत कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न इंग्लंडचा असणार आहे. यामुळे टीम इंडिया मालिका जिंकणार की इंग्लंड बरोबरी साधणार, याबाबत मोठी उत्सूकता असणार आहे.
टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड संभावित प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कॅप्टन/ विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, मोइन अली, क्रेग ओवरटन, डेविड विली, ब्रायडन कार्स आणि रीस टॉपली.