मुंबई : इंग्लंडची क्रिकेटपटू सारा टेलरने पुन्हा एका तिचा न्यूड फोटो शेयर केला आहे. याआधीही काहीच दिवसांपूर्वी साराने असाच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. ३० वर्षांची सारा टेलर इंग्लंड टीमची मुख्य खेळाडू आहे. साराने १२६ वनडे, ९० टी-२० आणि १० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. विकेट कीपर असूनही सारा एक उत्तम बॅट्समन आहे. साराने वनडेमध्ये ७ शतकं केली आहेत. साराने वनडेमध्ये ८७ कॅच आणि ५१ स्टम्पिंग, टेस्टमध्ये १८ कॅच आणि २ स्टम्पिंग तसंच टी-२०मध्ये २३ कॅच आणि ५१ स्टम्पिंग केले आहेत.
साराने हातात बॅट ठेवून एक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. 'मला अशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे,' असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सारा टेलर ही महिलांच्या आरोग्यविषयी अडचणींबाबतच्या मोहिमेचा भाग आहे. युकेच्या वुमन्स हेल्थ मॅगझिनने महिलांच्या शारिरिक अडचणींबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी मोहीम सुरु केली.
याआधीही साराने न्यूड फोटो शेयर केला होता, तेव्हा 'महिलेला तिच्या शरिराचा अभिमान असला पाहिजे. जे लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही. पण महिलांच्या आरोग्यासाठीच्या मोहिमेत सहभागी झाल्याचा मला अभिमान आहे. मला अनेक शारिरिक अडचणींचा सामना करावा लागला. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मला त्या अडचणींवर मात करावी लागली. यामुळे मी जागरुक झाले. प्रत्येक मुलगी आणि महिला सुंदर आहे, लक्षात ठेवा,' असं सारा टेलर तेव्हा म्हणाली होती.