India Cricket Team: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 world cup) मध्ये टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये (Semifinal) बाहेरचा रस्ता मिळाला. यामागे एक मोठं कारण ठरलं ते टीम इंडियाची (Team india) गोलंदाजी. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा एकंही गोलंदाज विकेट काढू शकला नाही. त्यामुळे 10 विकेट्सने भारताचा पराभव झाला. टीम इंडियाची गोलंदाजीची बाजू पाहता स्क्वॉडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी टीममध्ये 1 वर्षापासून नसलेल्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे.
टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला अनेक टीकांना सामोरं जावं लागतंय. अशात आता सिलेक्टर्सने टीममध्ये मोठे बदलाव करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये टी नटराजन (T. Natarajan) कमबॅक करू शकतो. मुख्य म्हणजे नटराजन तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळलेला आहे.
नटराजन त्याच्या करियरच्या सुरुवातीपासूनच 'यॉर्कर मॅन' म्हणून प्रसिद्ध होता. मात्र त्यानंचर त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. नटराजनच्या यॉर्कर गोलंदाजीची तुलना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजाशी केली जाते. टी नटराजनने IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळताना आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. टी. नटराजनने आयपीएल 2022 च्या 11 सामन्यात 18 विकेट घेतल्या.
नटराजनने भारतासाठी 1 टेस्ट मॅच, 4 टी20 इंटरनेशनल मॅच आणि 2 वनडे इंटरनेशनल मॅच खेळलेत. या गोलंदाजाने टेस्टमध्ये 3 विकेट्स, टी20 इंटरनेशनलमध्ये 7 विकेट्स आणि वनडेमध्ये 3 विकेट्स काढलेत. नटराजनने शेवटचा सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळला होता.