'या' खेळाडूचा Hardik Pandya ला धोका, सेलेक्टर्सला मिळाला उत्कृष्ट रिप्लेसमेंट

न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळणे जवळपास निश्चित झाले आहे.

Updated: Dec 7, 2021, 03:54 PM IST
'या' खेळाडूचा Hardik Pandya ला धोका, सेलेक्टर्सला मिळाला उत्कृष्ट रिप्लेसमेंट title=

मुंबई : हार्दिक पांड्या हा काही काळपूर्वी जगातील सर्वात मजबूत अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जात होता. वेगवान फलंदाजीसोबतच हा खेळाडू गोलंदाजीतही काही महत्त्वाच्या विकेट्स काढत असे. मात्र काही महिन्यांपासून हा खेळाडू आपल्या फॉर्ममध्ये नाही. हार्दिक आता केवळ गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही तो संघाची कमजोरी बनत आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळणे जवळपास निश्चित झाले आहे.

हा खेळाडू जागा हिसकावून घेऊ शकतो.

निवडकर्त्यांची नजर आता अशा खेळाडूवर आहे, जो आता कायमस्वरूपी हार्दिक पांड्याचे संघातील स्थान हिरावून घेणार आहे. या खेळाडून IPL 2021 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत करुन घेतलं आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही या खेळाडूने आपल्या खेळ दाखवला, ज्यामुळे तो आते संघात स्थान जवळ-जवळ पक्कं झालं आहे.

हा खेळाडू आहे केकेआर संघात खेळणारा व्यंकटेश अय्यर. तुफानी फलंदाजीसोबतच वेंकटेश अय्यर घातक गोलंदाजीमध्येही माहिर आहे.

या खेळाडूला किवी संघाविरुद्ध संधी देण्यात आली होती आणि आता हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही टीम इंडियात प्रवेश करणार आहे.

जगभरात चर्चा सुरू

व्यंकटेश अय्यरने IPL 2021 च्या 10 सामन्यांमध्ये 128.47 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा केल्या, ज्यामध्ये 4 उत्कृष्ट अर्धशतकांचा समावेश आहे. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून T20 मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण 48 टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये 24 बळी घेतले आहेत.

व्यंकटेश अय्यरने 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7 आणि 24 लिस्ट A सामन्यांमध्ये 5.50 च्या इकॉनॉमीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की, तो हार्दिक पांड्याला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळाली

व्यंकटेश अय्यरलाही किवी संघाविरुद्ध नुकतीच संधी देण्यात आली होती. या खेळाडूने फक्त छोट्या खेळी खेळल्या पण त्यात त्याने आगामी काळात काय करु शकतो? हे सगळ्यांना दाखवून दिलं आहे.

व्यंकटेशला 3 टी-20 सामन्यात फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही, पण त्याने सुमारे 130 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. आता हा फलंदाज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे पदार्पण करू शकतो.

अय्यरचा शोध दुसऱ्या टप्प्यात

बायो-बबलमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर या वर्षी मे महिन्यात आयपीएल पुढे ढकलावे लागले होते. त्यावेळी केकेआरचा संघ सातव्या स्थानावर होता. पण इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाने यूएईच्या टप्प्यात शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. जिथे त्याचा चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) पराभव झाला.

केकेआरने आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. कोलकात्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमध्ये 27 वर्षीय सलामीवीर व्यंकटेश अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने यूएई लेगमध्ये पदार्पण करताना आपली छाप पाडली.