मुंबई : टी-२० स्पर्धेत चेन्नई संघाची सुरुवात धमाकेदार झालीये. पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबईला हरवले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याचा पराभव केला. अखेरच्या क्षणी कोलकात्याच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी कोच स्टीफन फ्लेमिंग आणि फलंदाज फाफ डू प्लेसिस संघासाठी शेफ बनले होते. मजेची गोष्ट म्हणजे हरभजन सिंगने शर्टलेस शेफ फाफ डू प्लेसिसचा व्हिडीओही शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
दोन वर्षाच्या बंदीनंतर स्पर्धेत परतलेल्या चेन्नई संघाचे सर्व सामने पुण्यात हलवण्यात आलेत. कावेरी वाद प्रकरणामुळे चेन्नईचे सामने शिफ्ट करण्यात आलेत. दरम्यान या निर्णयामुळे चेन्नईचे क्रिकेटर तसेच फॅन्स मात्र हिरमुसलेत.
या सगळ्यात हरभजन सिंगने सोशल मीडियावर आपल्या अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि चेन्नईचा फलंदाज फाफ डू प्लेसिस शेफ झालाय. डू प्लेसिस शर्ट काढून आपल्या सहकाऱ्यांसाठी जेवण बनवताना दिसतोय. हरभजन सिंगने हा व्हिडीओ शेअर केलाय.
चेन्नईतील सामने पुण्याला हलवल्यानंतर चेन्नईच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी भावनिक ट्विटही केले.