FIFA World Cup 2022 Final, Argentina vs France: फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात 20 मिनिटे झाली आणि डि मारियाच्या एका प्रयत्नाने पहिली पेनल्टी मिळाली आणि त्याचं रुपांतर स्टार खेळाडू मेस्सीने गोलमध्ये करत 1- 0 अशी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सचा कॅप्टन आणि गोलकिपर लॉरिसने मेस्सीची पेनल्टी चुकवली आणि या वर्ल्ड कपमध्ये मेस्सीने सहावा गोल केला. तर मेस्सीने वर्ल्ड कपच्या इतिहासात मोठा विक्रम केला आहे.
मेस्सीचा विश्वचषक इतिहासातील 12 वा गोल नोंदवला. एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू आहे. मेस्सीच्या गोलमुळे आता सामना अधिकच रंगतदार झाल्याचं पहायला मिळतंय.
AT FIRST MESSI SCORES THE GOAL FROM THE SPOT.
AND THEM DI MARIA SCORES ONE OF THE BEST GOAL OF THIS #FIFAWorldCup #ArgentinaVsFrance #Messi #Messi pic.twitter.com/bB0duzpr0a— (@EinsteinG_) December 18, 2022
शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी डि मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला आहे. त्यामुळे आता फायनलच्या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. मेस्सीच्या या गोलमुळे तो गोल्डन बूटच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या रणनितीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.