Deepika Padukone : दीपिका FIFA World Cup Final मध्ये रचणार इतिहास

फुटबॉलशी काही संबंध नसताना दीपिका पदुकोन करणार ऐतिहासिक कामगिरी!

Updated: Dec 6, 2022, 12:42 AM IST
Deepika Padukone : दीपिका FIFA World Cup Final मध्ये रचणार इतिहास title=

FIFA World Cup Final Deepika Padukone : FIFA वर्ल्ड कप चालू असून अवघ्या काही दिवसांवर आता Final आली आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे. फायनल सामन्यात ट्रॉफीचं अनावर प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन करणार असल्याची माहिती समजत आहे. (FIFA world cup Final 2022 deepika padukone will unveil becoming first actress receive this honor latets marathi sport news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

दीपिका पदुकोन ही जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत असा मान मिळावणारी पहिली अभिनेत्री असेल. कतारमधील लुसेल आयकॉनिक स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दीपिकासोबत अभिनेत्री नोरा फतेही ही कतारमधील फिफा फॅन फेस्टमध्ये 'लाइट द स्काय' या वर्ल्ड कप गाण्यावर परफॉर्म करणार आहे.

दीपिकासाठीही फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच अनावरण करणं ही सन्मानाची बाब असणार आहे. ही बातमी समोर आल्यावर दीपिकाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाच्या करिअरमध्ये हा एक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

दरम्यान, सध्या दीपिका अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता जॉन अब्राहमसोबत पठाणमध्ये दिसणार आहे. यासोबतच दीपिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका रिमेकमध्येही दिसणार आहे.