Virat Kohli Sourav Ganguly : पहिलं हँडशेक मग एक झप्पी; विराट-गांगुली यांच्यातील वाद अखेर संपुष्टात?

Virat Kohli Sourav Ganguly : दिल्लीने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला अखेर घेतला आहे. दरम्यान या सामन्यात गांगुली आणि विराट यांच्यातील वाद संपला असल्याचंही दिसून आलंय.

सुरभि जगदीश | Updated: May 7, 2023, 11:47 PM IST
Virat Kohli Sourav Ganguly : पहिलं हँडशेक मग एक झप्पी; विराट-गांगुली यांच्यातील वाद अखेर संपुष्टात? title=

DC vs RCB: शनिवारी आयपीएलमध्ये (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध रॉयल चॅलेंजर (Royal Challengers Bangalore) बंगळूरू यांच्यात (DC vs RCB) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) तुफान फलंदाजी करत बंगळूरूचा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर दिल्लीने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. दरम्यान या सामन्याकडे चाहत्यांचं अधिक लक्ष होतं, कारण यापूर्वी झालेल्या सामन्यात कोणताही गोंधळ न घालता विराट (Virat Kohli) आणि गांगुली (Sourav Ganguly) एकमेकांशी भिडले होते. अशातच कालच्या सामन्यात देखील हे दोघं चर्चेत आले आहेत. 

शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने (Royal Challengers Bangalore) प्रथम फलंदाजी करत दिल्लीला (Delhi Capitals) 182 रन्सचं टार्गेट दिलं होतं. दिल्लीच्या फलंदाजांनीही या सामन्यात कोणतीही चूक न करता 7 विकेट्सने हा सामना जिंकून घेतला. मात्र या सामन्यांनंतर व्हायरल झालेल्या फोटोने एक सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

या सामन्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली एकमेकांसोबत हात मिळवताना दिसले. या दोघांचाही हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, दोघंही त्यांचा जुना वाद विसरून हातमिळवणी करतायत.   

सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला असताना दोघांमध्येही वाद सुरु झाला होता. त्यावेळी विराट कोहलीकडे तिन्ही फॉर्मेटच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र यावेळी 2021 च्या टी-20 वर्ल्डकप पूर्वी विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि गांगुलीवर अनेक आरोपंही लावले. यानंतर गांगुली आणि विराटमध्ये बिनसलं असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

वादानंतर पुन्हा आयपीएलमध्ये पडली होती ठिणगी

आयपीएल 2023 या सिझनमध्ये पहिल्यांदा दिल्ली आणि बंगळूरू जेव्हा एकमेकांशी भिडले होते, त्यावेळी सामन्यापेक्षा विराट आणि गांगुली यांच्यातील वादावरच अधिक चर्चा होत होती. बंगळूरू फिल्डींग करत असताना विराट कोहलीने डग आऊटमध्ये बसलेल्या गांगुलीकडे रागाने पाहत होत असल्याचं समोर आलं होतं. तर सामना संपल्यानंतर विराटने गांगुलीचा हँडशेक करणं टाळलं होतं. यानंतर दोघांमधील जुना वाद अजून कायम असल्याच्या चर्चा होत्या.

दोघांमधील वाद अखेर संपुष्टात?

शनिवारी झालेल्या सामन्यात चाहत्यांचं या दोघांकडे लक्ष होतं. मात्र या दोघांनी सामन्या अखेरीस एकमेकांशी हातमिळवणी केली. त्यामुळे दोघांमधील वाद संपुष्टात येऊन दोघांनी हँडेशेक केलंय, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.