माझ्यासाठी संजू सॅमसन, रिषभ पंतच्या पुढे निघून गेला आहे : पीटरसन

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याचं मत

Updated: Oct 10, 2020, 06:43 PM IST
माझ्यासाठी संजू सॅमसन, रिषभ पंतच्या पुढे निघून गेला आहे : पीटरसन title=
(फोटो-BCCI/IPL)

दुबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने ऋषभ पंत हा सातत्य राखण्यात अपयशी ठरत असल्याचं म्हटलं आहे. पीटरसन म्हणतो की, पंत अजूनही सातत्यपूर्ण कामगिरीची वाट पाहत आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळत असलेल्या पंतने आतापर्यंत सहा सामन्यांत 31, 37, 28, 38, 37 आणि 5 धावा केल्या आहेत. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही मोठा डाव खेळलेला नाही.

पीटरसनचा असा विश्वास आहे की, राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पंतने सातत्यपूर्ण डाव खेळला पाहिजे. स्टार स्पोर्ट्स शो दरम्यान पीटरसन म्हणाला की, "ऋषभ पंत निराश करणारा एक खेळाडू आहे, कारण त्याच्याकडून मला जास्त आशा आहेत."

माजी अनुभवी खेळाडू म्हणतो की, 'मी अजूनही त्याच्या फलंदाजीद्वारे सातत्यपूर्ण कामगिरीची वाट पाहत आहे." भारतीय संघाचा टॅग मिळविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला सातत्य हवे. आपण चांगले असणे आवश्यक आहे. मी गेल्या एक वर्षापासून त्याच खेळाडूला पाहत आहे.'

सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पंत भारतीय संघाच्या सर्व स्वरूपात खेळतो. मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघात पंतला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. तथापि, पंतला या भूमिकेसाठी संजू सॅमसनकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागला आहे. पण पीटरसन सॅमसनच्या खेळातील सुधारणांमुळे प्रभावित झाला आहे.

तो म्हणातो की, 'दुसरीकडे जेव्हा मी सॅमसनकडे पाहतो तेव्हा मला काहीतरी वेगळंच दिसतं. यावर्षी त्याने आयपीएलमध्ये व्यक्त केलेल्या समर्पण आणि वचनबद्धतेने मला प्रभावित केले. त्याने आहार, फिटनेस आणि समर्पणा याबाबतीत माझ्यासाठी तरी पंतला खरोखरच मागे टाकले आहे.'

पीटरसन पुढे म्हणाला की, "त्यांने मला सांगितले की मला मैदानावर जायचे आहे आणि भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मी सर्वकाही करू इच्छित आहे. त्याने धावा केल्या. तो काही प्रसंगात अपयशी ठरला, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुम्हाला अशा समर्पणांची आवश्यकता आहे कारण जर गोष्टी कठीण झाल्या तरच अधिक गोष्टी चांगल्या होतात. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे एक कठीण स्थान आहे."