Gautam Gambhir | गौतम गंभीर रवी शास्त्रींवर संतापला, या वक्तव्यावरुन सुनावलं, म्हणाला.....

टीम इंडियाचा (Team India) माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gauram Gambhir) टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींवर (Ravis Shastri) संताप व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे. 

Updated: Nov 22, 2021, 03:33 PM IST
Gautam Gambhir | गौतम गंभीर रवी शास्त्रींवर संतापला, या वक्तव्यावरुन सुनावलं, म्हणाला..... title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gauram Gambhir) टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींवर (Ravis Shastri) संताप व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे. गंभीरने विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडसह (Team India Head Coach Rahul Dravid) तुलना करत शास्त्रींवर निशाणा साधला आहे. गंभीरनुसार, टीम इंडिया क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम टेस्ट टीम आहे, असं रवी शास्त्रींनी म्हणनं या विधानातून त्यांच्या अहंकाराचं दर्शन होतं. (Former cricketer Gautam gambhir critisize to former team india coach ravi shastri over to praised team india performence australia 2019 test series statement)

टीम इंडियाने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत पराभव केला होता. हा मालिका विजय 1983 च्या वर्ल्ड कप विजयापेक्षा मोठा असल्याचं शास्त्री म्हणाले होते.या विधानावरुन गंभीरने आक्षेप घेतला. या विधानावरुनच गंभीरने शांस्त्रींवर निशाणा साधला.

गंभीर काय म्हणाला?

"एक गोष्ट मला खटकली, ती म्हणजे तुम्ही जेव्हा चांगलं खेळता, तेव्हा तुम्ही स्वत:चं कौतुक करत नाहीत. तुमच्या कामगिरीचं कौतुक कोणी दुसरं करत असेल तर ते योग्य आहे. जेव्हा टीम इंडियाने 2011 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा आमच्यापैकी कोणीही असं वक्तव्य केलं नव्हतं की आम्ही जगातील सर्वात बेस्ट टीम आहोत.", असं गंभीरने नमूद केलं.

तो टाईम्स नाऊच्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळस तो बोलत होता.

"जेव्हा तुम्ही विजयी होता, तेव्हा इतरांना कौतुक करु द्या. तुम्ही ऑस्ट्रेलियात जिंकलात ही मोठी गोष्ट होती. तुम्ही इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली कारण चांगली कामगिरी केलीत, यामध्ये कोणालाही शंकाच नाही. इतरांना तुमच्या विजयाचं कौतुक करायला हवं. तुम्हाला अशा प्रकारचं वक्तव्य राहुल द्रविडकडून ऐकायला मिळणार नाही, मग टीम इंडिया चांगली खेळो किंवा वाईट. द्रविड नेहमीच तटस्थपणे बोलतो", असंही गंभीरने स्पष्ट केलं.

शास्त्रींच्या कार्यकाळ आणि टीम इंडिया

रवी शास्त्री यांची 2017 मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये फेरनियुक्ती करण्यात आली. रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने परदेशात शानदार कामगिरी केली.

मात्र त्यांच्या मार्गदर्शनात आणि विराट कोहलीच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलं नाही. दरम्यान टी 20 वर्ल्ड कपनंतर शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड ही जबाबदारी सार्थपणे पार पाडतोय.