नवी दिल्ली : राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या सल्लागार पदांच्या नियुक्तीला बंदी आणणे हा त्यांचा अपमान आहे. या दोन्ही खेळाडूंशी बोलणे झाले तर सर्व काही स्पष्ट होते. दोन्ही खेळाडूंसोबत असे काही होणे चुकीचे आहे, असे माजी क्रिकेटर मदनलाल म्हटले आहे.
द्रविड आणि झहीर यांचा नियुक्तीला बंदी आणणे हा त्यांचा सार्वजनिक अपमान करणे आहे. असे सीओएचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी म्हटले होते. त्याला मदनलाल यांनी दुजोरा दिला आहे.
मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. भारतीय संघाच्या मुख्य कोचच्या नियुक्तीचे प्रकरण योग्य प्रकारे बीसीसीआयने हाताळले नाही, असेही मदनलाल म्हणाले.
विराट कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादावर मदनलाल म्हणाले, की ड्रेसिंग रुममधील वाद हा मीडियामध्ये येणे चुकीचे आहे. दोघांनी संयम ठेवला पाहिजे होता.