तोंडाला बॉल लागून जबडा तुटला, गॅरी कर्स्टन गंभीर जखमी

भारताचा माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टनच्या तोंडाला बॉल लागून गंभीर दुखापत झाली आहे. ग

Updated: Jan 18, 2018, 09:28 PM IST
तोंडाला बॉल लागून जबडा तुटला, गॅरी कर्स्टन गंभीर जखमी title=

होबार्ट : भारताचा माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टनच्या तोंडाला बॉल लागून गंभीर दुखापत झाली आहे. गॅरी कर्स्टन सध्या ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हुरीकेन्सचा प्रशिक्षक आहे.

होबार्टचा बॅट्समन डाआरसीबरोबर कर्स्टन नेटमध्ये सराव करत होता. डीआरसीला नेटमध्ये बॉल टाकत असताना तो बॉल कर्स्टनच्या तोंडाला लागला आणि त्याचा जबडा तुटला. तसंच कर्स्टनचे दातही पडले. यानंतर कर्स्टनला पुन्हा दात बसवण्यात आले. सुदैवानं कर्स्टनवर शस्त्रक्रिया करायची गरज नाही.

मैदानामध्ये ओलावा असल्यामुळे डाआरसी आणि कर्स्टन इनडोअर सराव करत होते. यावेळी डाआरसीनं मारलेला एक बॉल कर्स्टनच्या तोंडावर आदळला.

२७ वर्षांचा डाआरसी हा बिग बॅश लीगमधल्या यंदाच्या मोसमातला सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू आहे. डाआरसीनं या मोसमात १५३.४६ च्या स्ट्राईक रेटनं ४६५ रन्स केल्या आहेत.