world cup 2011 | वर्ल्डकप विजेत्या टीमचा खेळाडू असलेल्या गंभीरचे खडे बोल! गौतम गंभीर म्हणतो, '' एकाच जणाची स्तुती का?''

फायनलमध्ये महेद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावा केल्या आणि शेवटच्या एका षटकारासह भारताला विजय मिळवून दिला. धोनीने हा षटकार

Updated: Apr 2, 2021, 09:45 PM IST
 world cup  2011 | वर्ल्डकप विजेत्या टीमचा खेळाडू असलेल्या गंभीरचे खडे बोल! गौतम गंभीर म्हणतो, '' एकाच जणाची स्तुती का?''  title=

मुंबई : फायनलमध्ये महेद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावा केल्या आणि शेवटच्या एका षटकारासह भारताला विजय मिळवून दिला. धोनीने हा षटकार नुवान कुलसेकराच्या चेंडूवर मारला होता. महेद्रसिंग धोनीचा हा षटकार फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पण धोनीच्या या षटकारावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी जहाल टीका केली आहे.

गौतम गंभीर भारताच्या World Cup 2011 च्या विजयी टीमचे सदस्य होते. अंतिम सामन्यात गंभीरने श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची काढून, भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. आज भारत वर्ल्डकप जिंकून 10 वर्षे झालेत.  गौतम गंभीरने या सामन्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. गंभीरच्या मते भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या षटकारांच्या जोरावर भारताने विश्वचषक जिंकला नव्हता. विश्वचषक जिंकण्यामागे संघातील सर्व खेळाडूंचे योगदान होते.

गौतम गंभीरने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले, फक्त एका व्यक्तीमुळे वर्ल्ड कप जिंकता येण शक्य नाही, एकट्याच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकणं शक्य असतं तर आतापर्यंत भारत सर्व विश्वचषक जिंकला असता.

दुर्दैवाने भारतात काही निवडक लोकांनाच स्तुतीच्या पात्र समजले जाते आणि हे मला  मुळीच पटत नाही. टीमवर्कमध्ये एकट्या खेळाडूमुळे विजय मिळणं शक्य नाही. सामन्यात प्रत्येकाचे योगदान समान आहे. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या सदस्यांच्या योगदानाची नोंद करुन गंभीरने धोनीच्या षटकांवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गंभीर म्हणतो, झहीर खानचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. अंतिम सामन्यात झहीरने त्याच्या स्पेलमध्ये सलग तीन मेडन ओवर दिले. तसेच युवराजसिंगची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी, सचिन तेंडुलकरचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक आपण कधीही विसरू शकत नाही. पण तरीही कायम फक्त 'त्या' षटकारांबद्दलच बोलल्या जाते.

जर एक षटकार विश्वचषक जिंकू शकतो तर युवराजसिंगने भारतासाठी एकाच ओवरमध्ये सहा षटकार मारल्यामुळे त्याने भारताला सहा विश्वचषक जिंकवून दिले असे म्हणणं वावग ठरणार नाही. कोणीही युवराजसिंगबद्दल बोलतही नाही. २०११ च्या विश्वचषकात युवराज मैन ऑफ दी टूर्नामेंट ठरला, हे क्वचितच कुणाला आठवत असेल कारण सगळ्या फक्त त्या षटकारांच कौतुक आहे.

गौतम गंभीरच्या मते  २०११ क्रिकेट वर्ल्ड कपचा खरा हिरो युवराजसिंग आहे. तसेच युवराज सिंग 2007 टी -20 वर्ल्डकप आणि २०११ वर्ल्ड कप या दोन्ही मालिकेचा खरा नायक आहे.  या खेळासबंधी मुलाखतीत गंभीर खेळाबद्दल बोलत असले तरी राजकीय लहेजात जहाल टीका करतांना दिसले.