LSG च्या पराभवानंतर Gautam Gambhir ला राग अनावर; KL Rahul ची घेतली शाळा

बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊचा 14 रन्सने पराभव केला.

Updated: May 26, 2022, 09:28 AM IST
LSG च्या पराभवानंतर Gautam Gambhir ला राग अनावर; KL Rahul ची घेतली शाळा title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या नव्या टीमचा प्रवास संपला आहे. बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊचा 14 रन्सने पराभव केला. या विजयासह बेंगळुरू आता क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला आहे.

आयपीएलच्या सुरुवातीपासून केएल राहुलच्या टीमचा खेळ चांगला दिसून आला. यानंतर नखनऊ सुपर जाएंट्स यंदाची आयपीएल जिंकण्याची दावेदार मानली जात होती. मात्र रॉयल चॅलेंजर बंगळूरूने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. त्याचवेळी लखनऊ टीमचा मार्गदर्शक गौतम गंभीर या पराभवामुळे खूपच निराश दिसला.

गंभीर आणि राहुलचा फोटो व्हायरल

सामना हरल्यानंतर गौतम गंभीरने लखनऊ टीमचा कर्णधार केएल राहुलची चांगलीच शाळा घेतलीये. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि राहुल मैदानावरच बोलताना दिसले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा फोटोही व्हायरल झाला. हे पाहून गौतम आणि राहुल गंभीर मंथन करत असल्याचं दिसतंय.

आरसीबीविरुद्धच्या या एलिमिनेटर सामन्यात लखनौ टीमने खूप चुका केल्या. यावेळी फिल्डींग करत असताना अनेक कॅचंही सोडले. शिवाय फलंदाजीत जे अपेक्षित होतं ते दिसलं नाही. या सर्व गोष्टींबाबत गंभीरने राहुलशी चर्चा केली असल्याचं म्हटलं जातंय.
 
27 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या टीमची 29 मे रोजी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी लढत होईल.