Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.

Updated: Jun 12, 2023, 05:26 PM IST
Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं! title=
Gautam Gambhir yuvraj Singh

Gautam Gambhir On Yuvraj Singh: टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखला जातो. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 97 धावांची संयमी खेळी करून गंभीरने भारताला विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं होतं. याच गंभीरने एका मुलाखतीमध्ये खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाला गौतम गंभीर?

कोणताही एक खेळाडू अंडररेटेड नसतो. मार्केटिंग, पीआर त्या खेळाडूला अंडररेटेड करत असतात. हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय. युवराज पेक्षा जास्त टॅलेंटेड खेळाडू भारतात जन्माला आलेला पाहिला नाही, असं गंभीर म्हणतो.

युवराज सिंह (Yuvraj Singh) टीम इंडियाचा फार अंडररेटेड खेळाडू राहिलाच्याचं गौतम गंभीरने म्हटलं आहे. देशाला एक नव्हे तर दोन वर्ल्डकप जिंकून देणारा युवराज सिंग होता. माध्यमांनी त्याचं एवढं कौतुक केलं नाही जेवढं इतरांचं केलं, असं म्हणत गौतम गंभीरने धोनीला टोला लगावला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू म्हणजे युवराज सिंग आहे, असंही गौतम गंभीर म्हणतो.

2011 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्याचं काम युवराज सिंग याने केलं होतं. 2007 आणि  2011 दोन्ही वेळा तो मॅन ऑफ द सीरिज होता. मात्र, हे दुर्दैवं आहे. 2007 किंवा 2011 च्या वर्ल्डकपबाबत बोलताना आपण युवराज सिंगचं नाव घेत नाही. आपण युवराजचं नाव का नाही घेत? असंही गंभीर म्हणाला आहे. कुणी एक व्यक्तीने वर्ल्डकप जिंकवला नाही. संपूर्ण संघच जिंकतो. एक व्यक्ती कोणतीही मोठी स्पर्धा जिंकवून देत नाही, असं म्हणत गंभीरने धोनीच्या चाहत्यांवर टीकास्त्र सोडलंय.

आणखी वाचा - Team India: रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर विराट कोहली नाराज? Instagram पोस्टने उडाली खळबळ!

दरम्यान, किती लोक मोहिंदर अमरनाथबद्दल (Mohinder Amarnath) बोलतात? त्यांनी 1983 चा वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. फक्त कपिल देव यांचाच ट्रॉफी उचललेला फोटो दाखवला जातो, असं म्हणत गंभीरने नाराजी व्यक्त केली आहे.