Gautam Gambhir vs Virat kohli : गौतम गंभीर काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. अनेकदा आपली मतं त्याने रोखठोकपणे मांडली आहेत. मैदानात आणि मैदानाबाहेर देखील गंभीरची फटकेबाजी सुरू असते. विराट कोहली आणि गंभीर यांच्यातील आयपीएलमधील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आता गंभीर आणि विराट यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्यादरम्यान गंभीरने अयोग्य हावभाव केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या वादात गौतम गंभीर वादात सापडल्याचं पहायला मिळतंय.
शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला गेला. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघाला 1-1 गुण देण्यात आले. या सामन्यात समालोचनासाठी गौतम गंभीरला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी मैदानातू बाहेर पडताना गंभीरला खुन्नस दिली. प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाची घोषणाबाजी केल्याने गंभीरला राग आला. गंभीर आपल्या नादात जात असताना प्रेक्षकांनी त्याला डिवचलं. त्यावेळी गंभीरने प्रेक्षकांना मधलं बोट दाखवलं.
Retweet if you are not agree with Gautam Gambhir here what he did#IndvsNep #GautamGambhir pic.twitter.com/8pGeYE6FXO
— Sachin Chaudhary (@Tweets_Sachin1) September 4, 2023
भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आणि गौतम गंभीर यांच्यातील खुन्नसचा व्हिडीओ समोर आलाय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे गंभीर वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. याआधी देखील चाहत्यांनी गंभीरला आयपीएलवेळी ट्रोल केल्याचं दिसून आलं होतं. त्यावेळी देखील चांगलाच पेटल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, गौतम गंभीर, नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांना आयपीएल सामन्यादरम्यान आचारसंहितेचा (IPL Code of Conduct) भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. गंभीरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत येणाऱ्या लेव्हल 2 गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र, आता पुन्हा गंभीरला डिवचणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे.