कोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन शिलेदार अर्थात क्रिस लिन आणि आंद्रे रसेल ८ एप्रिलला होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होणार असल्याची माहिती केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी दिलीये.

Updated: Mar 22, 2018, 04:30 PM IST
कोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा title=

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सचे दोन शिलेदार अर्थात क्रिस लिन आणि आंद्रे रसेल ८ एप्रिलला होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होणार असल्याची माहिती केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी दिलीये.

मैसूरने सौरव गांगुलीचे पुस्तक ‘अ सेंचुरी इज नाट इनफ’च्या प्रकाशनसोहळ्यादरम्यान ही माहिती दिली. आम्हाला विश्वास आहे की लीन आणि रसेल आठ एप्रिलला खेळणार, असेही मैसूर म्हणाले. 

ऑस्ट्रेलियाचा लिन खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तान लीग खेळू शकला नव्हता. जर वेस्ट इंडिजचा क्रिकेटर रसेललाही पीसीएलदरम्यान दुखापत झाली होती. 

क्रिस लिन आणि आंद्रे रसेल यांना झाली होती दुखापत

क्रिस लिन ट्रायटी-२० सीरिजमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. ईडन पार्कमध्ये खेळवण्यात आलेल्या लिनला खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याचे आयपीएलमध्ये खेळणे संदिग्ध मानले जात होते. 

लिलावाआधी कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला ८.५० कोटी रुपयांना रिटेन केले होते. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला होता. दोन्ही खेळाडू आयपीएलमधील पहिल्या सामन्यासाठी फिट होतील अशी आशा केकेआरने व्यक्त केलीये. 

कोलकाता नाईट रायडर्स 

आंद्रे रसेल, सुनील नरेन, क्रिस लिन, मिचेल स्टार्क, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव, पियुष चावला, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शुबमन गिल, इशांक जग्गी, शिवम मावी, मिचेल जॉनसन, विनय कुमार, रिंकू सिंह, कैमरन डेलपोर्ट, जेवन सियरलेस, अपूर्व वानखेड़े.