WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 20, 2018, 12:07 PM IST
WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा title=

शिमला : WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

२८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत WWFचा थरार हिमाचल प्रदेशमध्ये पहायला मिळणार आहे. या सामन्यांसाठी मंडी येथील पड्डल आणि सोलनचे मैदान निवडण्यात आले आहे. या वेळी सामन्यांचे वैशिष्ट्य असे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेला हिमाचलचा पैलवान द ग्रेट खली उर्फ दलीप राणा स्वत: मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले १० पुरूष आणि ४ महिला पैलवानही सहभागी होणार आहेत. या शिवया २० भारतीय पैलवानांनाही आफला जलवा दाखवण्याची संधी मिळणार आहे.

या सामन्यांचे देश-विदेशात थेट प्रक्षेपण करण्याचा आयोजकांचा विचार असून, त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या सामन्यांमुळे केवळ खेळाला प्राधान्यच नव्हे तर, हिमाचल प्रदेशला WWFसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही ओळखले जाईल. स्पर्धेच्या आकर्षणातून असंख्य चाहते हिमाचल प्रदेशात येतील. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल, असाही हिमाचल प्रदेश सरकारचा विचार आहे.