हरभजन आणि गीताकडून आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

  गीता बसरा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हरभजन सिंगची पत्नी आहे. 

Updated: Sep 27, 2021, 03:25 PM IST
हरभजन आणि गीताकडून आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई :  गीता बसरा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हरभजन सिंगची पत्नी आहे. गीताचा जन्म इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. गीता तिथेच वाढली आणि नंतर भारतात आली. गीता बसरा आता दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि यावेळी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याआधी गीता आणि हरभजनला एक मुलगीही आहे.

प्रसूतीनंतर गीताने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या बाळाचे नाव उघड केले आहे.

तिने शएअर केलेल्या या पोस्टमध्ये तिची मोठी मुलगी तिच्या लहान भावासोबत दिसत आहे. आपल्या मुलीचा मुलासोबतचा फोटो शेअर करून गीताने बाळाचे नाव उघड केले.

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गीताने लिहिले, 'इंट्रोड्यूसिंग हीर चा वीर - जोवान वीर सिंह प्‍लाहा'. या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच हरभजन आणि गीता यांनी आपल्या मुलाचे नाव जोवान ठेवले आहे.

जोवन नावाचा अर्थ "देवाची भेट " आहे. या व्यतिरिक्त, जोवानला दयाळू, उदार देखील म्हटले जाते. तर गीता आणि हरभजन यांच्या मोठ्या मुलीचे नाव हिनाया आहे.

2015 मध्ये गीता बसरा ने टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सोबत लग्न केले. असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांना 3 वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. हरभजनशी लग्न केल्यानंतर गीता इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर राहिली. आता ती ना कुठल्या कार्यक्रमात, ना कुठल्या पुरस्कार सोहळ्यात, ना पार्टीमध्ये, ना चित्रपटात दिसत आहे.

गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज आपली मुलगी आणि पतीसोबत फोटो शेअर करत राहते. चित्रपटांपासून दूर, गीता तिच्या वैयक्तिक आयुष्याचा खूप आनंद घेत आहे.