Harbhajan Singh On Sanju Samson : टीम इंडियाने साखळी फेरीत तीन दमदार विजय मिळवले अन् सुपर 8 मध्ये एन्ट्री मिळवली. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि युएसए संघाचा पराभव केला. तर कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. अशातच आता टीम इंडिया येत्या 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) भिडणार आहे. गेल्या 3 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाल्याचं दिसतं नाही. त्यामुळे आता संजू सॅमसन (Sanju Samson) याला रोहित शर्मा मैदानात का उतरवत नाही? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. अशातच टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
संजू सॅमसनसोबत ऋषभ पंत देखील सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा भाग आहे. ऋषभ पंत सध्या तिसऱ्या क्रमांकावर खेळतोय. त्याचा रोल आता पूर्णपणे बदलला आहे. वर्ल्ड कपच्या आधी असं म्हटलं जात होतं की, तो चांगल्या धावा करत असल्याने त्याला संधी मिळेल. परंतू डाव्या उजव्या समीकरणामुळे ऋषभ पंत सध्या क्रमांक 3 वर खेळतोय. टीम इंडियासाठी ही खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे. संजूला येत्या काळात संधी मिळू शकते, असा विश्वास देखील हरभजनने व्यक्त केला.
भारतासाठी गुड न्यूज म्हणजे सध्या हार्दिक पांड्या विकेट घेतोय. तो चौथा गोलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करतोय. आनंदाची बाब म्हणजे तो अपेक्षेपेक्षा चांगला खेळ करत आहे, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. टीम इंडियासाठी नक्की आव्हानात्मक खेळ राहिला आहे आणि येत्या काळात टीम इंडियाला विजयासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल, असंही हरभजन सिंगने म्हटलं आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.