क्रिकेट का खुलासा: हरभजनच्या ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ

हरभजन काय मोठा खुलासा करणार याकडे लक्ष...

Updated: Sep 13, 2020, 11:32 AM IST
क्रिकेट का खुलासा: हरभजनच्या ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ

मुंबई : भारतीय स्पिनर हरभजन सिंगने शनिवार एक ट्विट केलं. ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हरभजनने क्रिकेट जगताशी संबंधित काही गुपीत त्याला कळाल्याचं म्हटलं आहे. यामुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल असं देखील त्याने म्हटलं आहे.

टर्बनेटरच्या नावाने ओळखला जाणारा हरभजन सिंगने ट्विटरवर म्हटलं की, 'क्रिकेटबाबत सध्या खूप काही बातम्या आहेत. पण आता मला असं काही कळालं ज्यामुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल. #CricketKaKhulasa.'

हरभजनच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याने हॅशटॅग क्रिकेट का खुलासा (#CricketKaKhusala) देखील वापरला आहे.

हरभजन सिंहने यंदा आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंह चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कडून खेळत आहे. सीएसकेकडे इमरान ताहिर, मिचेल सैंटनर, पीयूष चावला आणि रविंद्र जडेजा सारखे स्पीनर्स आहेत. 

यंदा कोरोनामुळे आयपीएल यूएईमध्ये होत आहे. आयपीएलमध्ये हरभजनने आतापर्यंच चांगली कामगिरी केली आहे. तो सुरुवातील मुंबई इंडियंस (Mumbai Indians) आणि नंतर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. आयपीएलच्या 160 सामन्यांमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत.