शिबानीच्या ट्विटवर बोल्ड झाला हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र, आता त्याची चर्चा केवळ खेळामुळे नाहीतर आणखीन एका कारणामुळे होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 21, 2017, 10:25 PM IST
शिबानीच्या ट्विटवर बोल्ड झाला हार्दिक पांड्या  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र, आता त्याची चर्चा केवळ खेळामुळे नाहीतर आणखीन एका कारणामुळे होत आहे.

रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये आपली जबरदस्त कामगिरी दाखवला. या प्रदर्शनामुळे तो पूढचा सुपरस्टार असल्याच्या बातम्यांवर त्याने एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे. पण आता हार्दिकची सोशल मीडियात एका वेगळ्याच कारणामुळे जोरदार चर्चा होत असल्याचं पहायला मिळत आहे.

रविवारी हार्दिक पांड्याने खेळलेल्या जबरदस्त इनिंगनंतर टीव्ही होस्ट शिबानी दांडेकरने त्याचं कौतुक केलं. शिबानीने ट्विट करत हार्दिकचं कौतुक केलं. शिबानीने केलेल्या ट्विटनंतर हार्दिकनेही त्याला रिप्लाय दिला.

यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये दोघेही ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. पाहूयात दोघांमध्ये नेमकं काय टिवटिव झाली ते...

शिबानी दांडेकरने ट्विट करत म्हटलं की, हार्दिक तु गँगस्टर आहेस, जबरदस्त खेळलास, धन्यवाद. त्यानंतर हार्दिकने रिप्लाय करत म्हटलं, हाहाहा थँक्यू शी.