'कोणाला 50 टक्केही देऊ इच्छित नाही..' हार्दिकच्या 'त्या' व्हिडीओवर लोकं म्हणतात Visionary Pandya

Hardik Pandya Divorce Case:  हार्दिकच्या मुलाखतीतील जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हार्दिकचे फॅन्स हा जुना व्हिडीओ व्हायरल करतायत. 

Pravin Dabholkar | Updated: May 26, 2024, 06:14 AM IST
'कोणाला 50 टक्केही देऊ इच्छित नाही..' हार्दिकच्या 'त्या' व्हिडीओवर लोकं म्हणतात Visionary Pandya title=
Hardik Pandya Divorce

Hardik Pandya Divorce Case:  भारतीय संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या सुरु आहेत. हार्दिकने 2020 मध्ये सर्बियन मॉडेल नतासा स्टॅनकोविकसोबत लग्न केले. नताशाने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमधून हार्दिकचे नाव काढले. यानंतर काही वेळापुर्वी तिने 'कोणीतरी रस्त्यावर येणार आहे' असे स्टेटसदेखील ठेवले. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले. घटस्फोटानंतर हार्दिकला 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल, अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हार्दिकच्या मुलाखतीतील जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हार्दिकचे फॅन्स हा जुना व्हिडीओ व्हायरल करतायत. हार्दिकला आपल्या भविष्याबद्दल माहिती होतं..वैगेरे लिहीत आहेत. 

2024 वर्षे हार्दिकला धक्का देणारे ठरतंय.  आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाले आणि त्यावरून बराच गदारोळ झाला. रोहित शर्माच्या फॅन्सना ते आवडले नसल्याने त्यांनी पांड्याला चांगलेच ट्रोल केले. त्यात मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आलाय. 

हार्दिकचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल 

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो गौरव कपूरशी बोलत आहे. मी सर्व काही माझ्या आईच्या नावावर केले आहे, असे हार्दिक आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतोय. 'सगळं आईच्या नावावर आहे. गाडीपासून घरापर्यंत सर्व काही. मी ते माझ्या नावावर घेणार नाही. मी पुढे जाऊन इतर कोणालाही 50 टक्के देऊ इच्छित नाही. मला खूप त्रास होईल.,असेही हार्दिकने सांगितले आहे. 

फॉर्मही चांगला नाही

वैयक्तिक आयुष्यासोबतच हार्दिक पांड्यासाठी क्रिकेटच्या मैदानावरही काही चांगले चाललंय असे नाही.  आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले. यानंतर त्याने रोहित शर्माला दिलेली वागणूक चाहत्यांना आवडली नव्हती. हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आयपीएल सुरू झाल्यानंतर हार्दिक पांड्या स्टेडियममध्ये आल्यावर त्याला ट्रोल केले जायचे. 

हार्दिककडे 5 कोटींचे घर, पेंटहाऊस 

हार्दिककडे एक पेंटहाऊस आहे. ज्याची किंमत 3.6 कोटींपेक्षा जास्त आहे. वडोदा येथील वाघोडिया रोडवर असलेले त्यांचे घर खूपच आलिशान आहे. स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या सुमारे 11 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 91 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. याशिवाय पांड्या बंधूंचे मुंबईतील वर्सोवा भागात 2BHK अपार्टमेंट आहे. याशिवाय काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हार्दिक पांड्याने मुंबईत 30 कोटी रुपयांचा अपार्टमेंट घेतला आहे. हार्दिक पांड्याकडे गाड्यांचे कलेक्शन आहे. पांड्याकडे ऑडी ए6, लंबॉर्गिनी हर्कन ईव्हीओ आणि मर्सिडीज जी वॅगन सारख्या करोडो रुपये किंमतीच्या कार आहेत.