IPL 2024 Mumbai Indian Captain Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच एक मोठी घोषणा केली. रोहित शर्माला (Rohit Sharma) डावलून करार करून टीममध्ये घेतलेल्या हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) हाती टीमची धुरा सोपवली. यावेळी मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. इतकंत नाही तर रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने खुलेपणाने काहीही बोलून दाखवता सोशल मीडिया कमेंटवरून रोहितला कर्णधारपदावरून काढल्याची नाराजी दर्शवली होती. मात्र आता होळीच्या निमित्ताने मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने रितीका सजहेदला मिठी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक चाललंय का, हा प्रश्न सध्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला. यावेळी 6 रन्सने मुंबईचा पराभव झाला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच सामना होता. असं म्हटलं जातंय की, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे एका गटात आहेत. तर हार्दिक पांड्या, इशान किशन आणि इतर काही खेळाडू वेगळ्या गटात आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याचं म्हटलं जातंय.
गुजरात टायटन्सविरुद्ध हार्दिक ज्या प्रकारे रोहितला फिल्डींग दरम्यान इकडे-तिकडे धावण्यास सांगत होता, ते चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. जेव्हा मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधारपदी नियुक्त केले होते, तेव्हा रितिका सजदेहने सोशल मीडियावर काही पोस्टवर कमेंट केली होती, ज्या पाहून तिलाही हा निर्णय आवडला नसल्याचे स्पष्ट झालं होतं. अशातच मुंबई इंडियन्स टीमने 25 मार्च रोजी होळी साजरी केली आणि या दरम्यान सर्व खेळाडूंनी मिळून होळी साजरी केली.
यावेळी होळी खेळत असताना एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहकडे जातो आणि तिला मिठी मारतो. यावेळी त्याने तिला होळीच्या शुभेच्छा दिल्या. रितिका आणि समायरा एकत्र होळी खेळत होत्या तेव्हा ही घटना घडली. रितिकानेही हार्दिकला मिठी मारून होळीच्या शुभेच्छा दिल्याचं दिसून आलं.
Hardik Pandya hugged Ritika Sajdeh in the Holi Celebrations.
- A beautiful video! pic.twitter.com/quGSekiu4o
— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 25, 2024