Nitish Reddy On Hardik Pandya : आयपीएलमुळे आता टी-ट्वेंटी क्रिकेटचा फॉरमॅट पूर्णपणे बदललाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजकाळ 200 चं टार्गेट देखील किरकोळ वाटायला लागलं आहे. आयपीएलमधून नव्या चेहऱ्यांना थेट टीम इंडियामध्ये येण्याची संधी मिळतीये. त्यामुळे काही तरुण खेळाडू देखील चमकले आहेत. त्यातलच एक नाव म्हणजे नितीश रेड्डी... नितीश रेड्डीने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांना चकित केलंय. नितीश रेड्डीची झिम्बॉब्वे दौऱ्यात निवड झाली होती. पण जायबंदी झाल्याने त्याचा प्रवास थांबला. अशातच नितीश रेड्डूने आपले अनूभव सांगितले अन् हार्दिक पांड्यावर मोठं वक्तव्य केलं.
हार्दिक भाऊने मला एक मेसेज पाठवला की, तू मैदानावर दिलेली ऊर्जा चांगली होती आणि खेळाचा आदर करत राहा. आपण लवकर बोलू, आयपीएल हंगामानंतर त्याचा मेसेज पाहून मला धक्काच बसला, असं नितीश रेड्डीने म्हटलं आहे. हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक्स हे अष्टपैलू खेळाडू म्हणून माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत, असं नितीश रेड्डी म्हणाला. गेल्या 10 वर्षांपासून मी आरसीबीचा खूप मोठा चाहता आहे. 2023 मध्ये मला विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली. माझ्याकडे त्याला विचारण्यासारखे फारसे नव्हते, मला फक्त त्याचा हात हलवून त्याचा ऑटोग्राफ घ्यायचा होता, असंही नितीश रेड्डी म्हणाला.
मागच्या आयपीएलमध्ये म्हणजेच 2024 मध्ये मी आरसीबीविरुद्ध चांगला खेळू इच्छित होतो जेणेकरून विराट कोहली माझ्या खेळाची दखल घेईल. मात्र, त्या सामन्यात मला फलंदाजी करायला मिळाली नाही. परंतू तरी देखील सामन्यानंतर हँडशेकवेळी विराटला माझं नाव आठवलं. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, असंही नितीश रेड्डी म्हणतो.
दरम्यान, मला लिलावात अपेक्षा होती माझी नक्की निवड होईल. पण हैदराबाद मला घेईल असं मला वाटलं देखील नव्हतं. घरच्या संघासाठी खेळणं माझ्यासाठी नक्कीच सन्मान आहे. मी वडिलांना फोन केला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. जेव्हा मी टीम इंडियासाठी निवडलो गेलो, तेव्हा वडिलांना अश्रू अनावर झाले होते. पण मी दुखापतीमुळे बाहेर पडलो, असंही रेड्डी म्हणाला.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.