K Srikkanth Spoke On Suryakumar Captaincy : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला कॅप्टन (Team India Captain) बनवण्यात आलंय. सूर्याचं प्रमोशन झालं असलं तरी दुसरीकडे हार्दिक पांड्याचं डिमोशन झालंय. टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिली नाही अन् व्हाईस कॅप्टन्सी देखील दिली गेली नाही. तर वनडे मालिकेत देखील हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नारळ मिळालाय. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. अशातच आता माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मला वाटतं की ते ड्रेसिंग रूममधील फीडबॅकवरून गेलं आहेत. ते कदाचित आयपीएलमधून आले असावे, असं सुचक वक्तव्य के श्रीकांत यांनी केलं आहे. त्यामुळे श्रीकांत यांचा निशाणा रोहित शर्मावर होता का? असा सवाल विचारला जात आहे. फिटनेस ही गोष्ट मला मान्य नाही. तो संपूर्ण आयपीएल खेळला. त्याने गोलंदाजीही केली. होय, कदाचित आयपीएलमध्ये चांगली कामगिरी न करणे ही दुसरी समस्या आहे आणि तो चांगला खेळला, असं म्हणत श्रीकांत यांनी हार्दिक पांड्याची पाठराखण केलीये.
सूर्यकुमार महान कर्णधार होऊ शकतो, पण ड्रेसिंग रुमची प्रतिक्रिया का? मी ते समजण्यास सक्षम नाही. होय, सूर्यकुमारमध्ये कर्णधार बनण्याचे गुण आहेत. मी सहमत आहे. तो खूप चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध करू शकतो. पण हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण तर्कात कमी आहे, असं म्हणत श्रीकांत यांनी अजित आगरकर यांच्या सिलेक्शन कमिटीवर टीका केली आहे. आत्ताच स्पष्ट करा आणि न घाबरता सर्वांसमोर बोला, असंही श्रीकांत यांनी म्हटलंय.
दरम्यान, हार्दिक पांड्या हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण फिटनेस हे आव्हान आहे आणि कोणीतरी सतत उपलब्ध असावं, अशी आमची इच्छा आहे, असंही आगरकर पत्रकार परिषदेत म्हणाले होते. टी-20 संघाचा कर्णधार ठरवताना ड्रेसिंग रूमचा अभिप्राय देखील विचारात घेतला गेला होता, असं अजित आगरकर म्हणाले होते.