नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणित

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: महिन्याभरापासून अधिक काल हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. दरम्यान हार्दिककडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याने पत्नीला 70 टक्के संपत्ती पोटगी म्हणून दिली तर त्याच्याकडे किती पैसे उरतील पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2024, 03:48 PM IST
नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणित title=
हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेत असल्याचं केलं जाहीर

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून ( Natasa Stankovic) घटस्फोट (Divorce) घेत असल्याचं जाहीर केलं आहे. चार वर्षांच्या संसारानंतर आम्ही विभक्त होत आहोत, असं दोघांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करुन सांगितलं आहे. खरं तर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची मागील महिन्याभरपासून अधिक काळापासून चर्चा सुरु होती. याच चर्चेदरम्यान असंही सांगण्यात आलं की घटस्फोट झाल्यानंतर हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती (Hardik Pandya Property) नताशाला द्यावी लागेल. या चर्चेला कोणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र आता घटस्फोट निश्चित झाल्यानंतर हार्दिक पंड्याला पोटगी म्हणून खरोखरच 70 टक्के संपत्ती द्यावी लागली तर त्याला नेमकी किती रक्कम नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..

महिन्याभरापासून घटस्फोट चर्चेत

मागील काही आठवड्यांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला 18 जुलै रोजी पूर्णविराम मिळाला जेव्हा या दोघांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली. दोघांनीही आम्ही वेगळे होत असून दोघेही मुलगा अगस्त्यचं पालकत्वाची काळजी घेऊ असं म्हटलं आहे. चार वर्षानंतर हे दोघे वेगळे झाले आहेत. खरं तर जवळपास महिन्याभरापूर्वी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकल्याने या कथित घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.

नताशा मागील आयपीएल पर्वांप्रमाणे यंदा एकाही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित दिसली नाही. भारताने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतरही नताशाने हार्दिकला शुभेच्छा दिल्या नाहीत. दुसरीकडे हार्दिक पंड्याने नताशाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच दिल्या नसल्याने या संभाव्य घटस्फोटाला अधिक बळ मिळालं होतं. ही सगळी चर्चा सुरु असतानाच हार्दिकने नताशाला घटस्फोट घेतला तर हार्दिकच्या पॉपर्टीमधील 70 वाटा तिला पोटगी म्हणून मिळणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. 

नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं

हार्दिकची संपत्ती किती आणि कमाईचा स्रोत काय?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती 91 कोटी रुपयांची आहे. तसेच जाहिराती आणि ब्रॅण्ड प्रमोशनमधून त्याला बरीच रक्कम मिळते. बीसीसीआयच्या केंद्रीय कंत्राटानुसार तो ए ग्रेडेट क्रिकेटपटू असल्याने दरवर्षी त्याला बीसीसीआय 5 कोटी रुपये देते. तसेच हार्दिक पंड्या इंडियन प्रिमिअर लीगमधूनही बराच पैसे कामवतो. 2022 आणि 23 मध्ये गुजरात जायंट्सने त्याला 15-15 कोटी रुपये दिले होते. तो आयपीएलदरम्यान इतरही अनेक प्रोडक्ट प्रमोट करतो. नताशा अनेकदा त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असल्याचं यंदाचं वर्ष वगळता मागील अनेक वर्षांत दिसून आलं.  

नक्की वाचा >> Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलं

हार्दिककडे अनेक आलिशान गाड्या आणि घरं

हार्दिककडे अनेक आलिशान कार्स असून यामध्ये ऑडी ए6, रेंज रोवर व्होग, जीप कंपास, मर्सिडीज जी वॅगन, रोल्स रॉयस, लॅम्बॉर्गिनी हुराकन ईबीओ, पोर्श केयेन आणि टोयोटा इटियोसचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे येथे हार्दिक पंड्याचं 30 कोटींचं घर आहे. तसेच वडोद्यामध्येही त्याचं 3 कोटी 10 लाखांचं मोठं घर आहे.

हार्दिकची 70 टक्के संपत्ती म्हणजे किती?

आता हार्दिकच्या एकूण संपत्तीच्या 70 टक्क्यांबद्दल बोलायचं झालं तर 91 कोटींच्या हिशोबाने ही रक्कम 63 कोटी 70 लाख इतकी होती. म्हणजेच खरंच नताशाला 70 टक्के रक्कम मिळाली तर ती 63 कोटी 70 लाख इतकी असेल. म्हणजेच नताशाला 70 टक्के संपत्ती दिल्यास हार्दिककडे 27 कोटी 30 लाख रुपये इतकीच संपत्ती शिल्लक राहील.   

नक्की वाचा >> गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात

मात्र एवढी संपत्ती द्यावी लागणार नाही? 50 टक्के संपत्ती दिली तर किती पैसे शिल्लक राहतील?

दुसरीकडे हार्दिकचा एक जुना व्हिडीओही व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत हार्दिकने त्यांची 50 टक्के संपत्ती ही त्याच्या आईच्या नावावर केली आहे, असं सांगता दिसतोय. म्हणजेच हार्दिकची 45 कोटी 50 लाखांची संपत्ती त्याच्या आईच्या नावावर आहे असं गृहित धरलं तरी त्याच्या नावावरील 45.50 कोटींमधून 70 टक्के दिले तर नताशाला 31 कोटी 85 लाख रुपये पोटगी मिळेल. तर हार्दिककडे केवळ 13 कोटी 65 लाख रुपये शिल्लक राहतील.

(डिस्क्लेमर - हार्दिकच्या 70 टक्के संपत्तीवर नताशाने दावा सांगितल्याच्या वृत्ताला Zee 24 Tass दुजोरा देत नाही. सदर बातमीतील माहिती केवळ उपलब्ध आकडेवारीच्या आधारे मांडण्यात आलेली आहे)