close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धोनीच्या झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल....

काय आहे या व्हिडिओत

धोनीच्या झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल....

 मुंबई : आयरलँडच्या विरूद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यात टी 20 सिरीजमध्ये टीम इंडियाने 143 धावांच आव्हान दिलं. यासोबतच भारतने ही सिरीज 2-0 ने आपल्या नावे करून घेतली. सामन्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने धोनीची मुलगी झिवाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत झिवा हार्दिक पांड्याला चिअर अप करताना दिसत आहे. कम ऑन हार्दिक कम ऑन... हार्दिकने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, मला असं वाटतं की माझ्यासाठी मी नवी चीअरलेडी शोधली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आगे. 11 तासांत हा व्हिडिओ 6 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर झिवाचं कौतुक केलं जात आहे.  

दुसऱ्या टी 20 सामन्यात पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करत फक्त 9 चेंडूत चार छक्के आणि एक चौका मारत 31 धावा करून नॉट आऊट राहिला. धोनीसोहत शिखर धवन आणि जसप्रीत बुमराहला या सामन्यात आराम मिळाला होता. जेवढा लोकप्रिय धोनी आहे तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी झिवा देखील आहे. झिवाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आयपीएलच्या दरम्यान देखील झिवाचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले होते.

Image Credit : Shipra & Amit Chhobra Photography