हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचं दमदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

सुनील नरेन आऊट होताच स्टेडियममध्ये नताशा नाचली, हार्दिक पांड्याच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल

Updated: Apr 24, 2022, 11:01 AM IST
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचं दमदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात नवी टीम आली आहे. या टीमचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिक पांड्या खूप चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करत आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतोय. आयपीएलमध्ये 36 वा सामना गुजरात विरुद्ध कोलकाता झाला. या सामन्यात गुजरातने 8 धावांनी रोमांचक विजय मिळवला. 

गुजरात टीम पुन्हा एकदा पॉईंट टेबलवर टॉपवर आली आहे. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टीमसोबतच हार्दिक पांड्याची पत्नीही तेवढीच चर्चेत आली. हार्दिक पांड्याची पत्नी स्टेडियममध्ये अनोखं सेलिब्रेशन करताना दिसली. तिचा स्टेडियममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गुजरात टीमला सपोर्ट करण्यासाठी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेडियममध्ये उपस्थित होती. कोलकाताचा ओपनर सुनील नरेनला मोहम्मद शमीने लॉकी फर्ग्यूसनच्या हातून कॅच आऊट केलं. त्यानंतर नताशाला खूप आनंद झाला. नताशा आनंदाने उड्या मारायला लागली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कोलकाता टीमने 20 ओव्हरमध्ये 148 धावा केल्या. आंद्रे रसेलने 25 बॉलमध्ये 48 धावा केल्या. रसेल रनआऊट झाला त्याची तोटा कोलकाता टीमला झाला. गुजरातकडून शमी, यश, राशीदने प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. 

नताशा सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असते. ती आपल्या मुलासोबत आणि हार्दिकसोबतचेही व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे व्हिडीओ सर्वांना आवडतात. हार्दिक पांड्या पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये आल्याने चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. पुन्हा पांड्या टीम इंडियाकडून खेळताना दिसणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.