विराट म्हणतो, तरंच हार्दिक पांड्याला टेस्ट टीममध्ये स्थान

हार्दिक पांड्या टेस्ट सीरीजमधून बाहेर

Updated: Dec 9, 2020, 08:59 AM IST
विराट म्हणतो, तरंच हार्दिक पांड्याला टेस्ट टीममध्ये स्थान

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ ने मालिका जिंकली. वनडे मालिका भारताने २-१ ने गमवली होती. त्यानंतर आता ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये खरी लढत होईल. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच कोहलीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. हार्दिक पांड्या कसोटी मालिकेत खेळण्याच्या शक्यतेला त्याने उत्तर दिलं.

भारतीय कर्णधार म्हणाला की, टी-२० मालिकेत हार्दिकला मॅन ऑफ द सीरिज म्हणून निवडले गेले. पण तो कसोटी सामने खेळणार नाही. एकदिवसीय मालिकेत फलंदाजी व्यतिरिक्त हार्दिकने दोन्ही टी-२० सामन्यांमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. दोन्ही मालिकांमध्ये त्याने फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवले. कोहली कसोटी मालिकेपूर्वी म्हणाला की, जर तो खेळेल तर ऑलराऊंडर म्हणून त्याचं स्थान निश्चित होईल. अन्यथा नाही.

सामन्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोहली म्हणाला, "हार्दिक छान आहे, आम्हाला सामना संपविणारा खेळाडू सापडला आहे, परंतु कसोटी क्रिकेटची आव्हाने पूर्णपणे वेगळी आहेत. आम्हाला त्याच्या गोलंदाजीची ही गरज लागेल. तरच संघामध्ये संतुलन राखता येईल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये त्याच्या गोलंदाजीने संघाला संतुलन दिले आहे. तो कसोटी संघात फक्त पूर्ण ऑलराऊंडर म्हणून खेळू शकतो.'

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "मला वाटते आता घरी परतलं पाहिजे आणि कुटुंबासोबत थोडा चांगला वेळ घालवावा. मी त्यांना गेल्या चार महिन्यांपासून पाहिले नाही.'

हार्दिक पांड्यावर २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात पाठीच्या खालचा भागावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे हार्दिक पांड्या बॉलिंग करत नाहीये. सध्या फिटनेसकडे तो अधिक लक्ष देत आहे.