'कहीं खुशी कहीं गम', मुंबई जिंकल्यानंतर रोहित आणि हार्दिक यांच्या पत्नींचा चेहरा पाहण्यासारखा...

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 

Updated: May 7, 2022, 02:03 PM IST
'कहीं खुशी कहीं गम', मुंबई जिंकल्यानंतर रोहित आणि हार्दिक यांच्या पत्नींचा चेहरा पाहण्यासारखा... title=

मुंबई : प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमला विजयाचा सूर गवसला आहे. मुंबई इंडियन्सने लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 रन्सने विजय मिळवला. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 

या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये राहुल तेवातिया आणि डेविड मिलर क्रिजवर होते. दोन्ही फलंदाजांना डॅनियल सॅम्सच्या एकाही बॉलवर मोठा शॉट मारणं शक्य झालं नाही. या ओव्हरमधील शेवटच्या दोन बॉलवर मिलरला एकंही रन काढता आला नाही. अखेर 5 रन्सने मुंबईचा विजय झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

मुंबई जिंकल्याचं कळताच रोहित शर्मा बाऊंड्री लाईवरून धावत आला आणि इतर खेळाडूंना मिठी मारली. यावेळी स्टेडियमच्या स्टॅंडमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यां दोघांच्याही पत्नी बसल्या होत्या. सामना संपल्यानंतर दोघींच्याही चेहऱ्यावरील भाव हे भिन्न होते.

एकीकडे हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकचा चेहरा उतरला होता. तर दुसरीकडे रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहचा चेहरा खुलला होता. तिने आनंदाने सुर्यकुमार यादवच्या पत्नीला मिठी मारली. हा व्हिडीयो शोशल मीडियावर शेअर केला आहे.

शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans)  5 रन्सने थरारक विजय मिळवला. मुंबईने गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत सामना जिंकवला.