प्रसिद्ध स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात, Photo आले समोर

टीम इंडिया सध्या बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात व्यस्त आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान नुकतीच इंग्लंडविरूद्ध 3-0 ने टेस्ट मालिका हरलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा आहे. असे असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) लग्नबंधनात अडकला आहे. हारिसने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहे. 

Updated: Dec 24, 2022, 04:39 PM IST
प्रसिद्ध स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात, Photo आले समोर  title=

Haris Rauf Wedding: टीम इंडिया सध्या बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात व्यस्त आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान नुकतीच इंग्लंडविरूद्ध 3-0 ने टेस्ट मालिका हरलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा आहे. असे असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) लग्नबंधनात अडकला आहे. हारिसने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf Wedding) आणि शाहिन आफ्रिदीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf Wedding) लग्नबंधनात अडकला आहे. हारिस रौफने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नात पाकिस्तानी संघाचे अनेक विद्यमान आणि माजी दिग्गज खेळाडू उपस्थित होते.

कोण आहे हारिसची पत्नी? 

हारिस रौफने (Haris Rauf Wedding) मुजना मसूद मलिक सोबत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नात शाहिद आफ्रिदी आणि शाहीन शाह आफ्रिदीसारखे खेळाडू लग्नात दिसले होते. हारिसची पत्नी मुजना मसूद मलिक व्यवसायाने मॉडेल आहे.  मुजनाने हारिससोबत शिक्षण घेतले आहे. अलीकडच्या काळात दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान 24 ते 28 डिसेंबर या कालावधीत हारिसचा विवाह सोहळा सुरू राहणार आहे. त्यात त्यांच्या वलीमाचाही समावेश असेल. 

T20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलनंतर रौफने (Haris Rauf Wedding) एकही सामना खेळलेला नाही. अंतिम सामन्यानंतर त्याच्या दुखापतीची बाब समोर आली होती. तेव्हापासून तो अनफिट आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत रौफने भाग घेतला नव्हता.या मालिकेत पाकिस्तानला 3-0 ने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्याकडे मोठ्या आशेने पाहिले गेले होते. मात्र पाकिस्तानचा पराभव झाल्याने मोठी नाचक्की झाली होती.