CWG2018 : हीना सिद्धूचा सुवर्णवेध

हीना सिद्धूने २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ११वे सुवर्णपदक जमा केले. हीनाने २५ मीटर एअर पिस्तोल प्रकारात तिने हे जेतेपद मिळवले.

Updated: Apr 10, 2018, 08:53 PM IST
CWG2018 : हीना सिद्धूचा सुवर्णवेध title=

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खेळाडू चांगली कामगिरी करतायत. मंगळवारी भारताची अनुभवी महिला नेमबाजपटू हीना सिद्धूने भारतासाठी आणखी एक गोल्ड मेडल मिळवून दिले. हीना सिद्धूने २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ११वे सुवर्णपदक जमा केले. हीनाने २५ मीटर एअर पिस्तोल प्रकारात तिने हे जेतेपद मिळवले.

हीनाने या स्पर्धेतील रेकॉर्ड कायम राखताना ३८ गुण मिळवले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एलीना गॅलियावोविकला रौप्यपदक तर मलेशियाच्या आलिया सजानाला कांस्यपदक मिळाले. 

 

याआधी मंगळवारी अनु सिंह आणि हीना सिद्धूने जबरदस्त कामगिरी करताना सहाव्या दिवशी महिलांच्या २५ मीटर एअऱ पिस्तोल प्रकारात फायनलमध्ये जागा मिळवली होती.

भारताची महिला नेमबाजपटू मेहुली घोषने पाचव्या दिवशी सोमवारी शूट ऑफमध्ये पिछाडल्याने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये सुवर्णपदक मिळवू शकली नाही. तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

जीतू रायने जिंकले सुवर्ण

जीतू रायने राष्ट्रकुल स्पर्धेती १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात नवा रेकॉर्ड करताना सुवर्ण पदक जिंकले. ओमप्रकाश मिठारवालने कांस्य पदक जिंकले.