Sanju Samson Controversial Decision: आयपीएलमध्ये 56 वा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये दिल्लीचा विजय झाला असून राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न लांबणीवर पडलं आहे. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे मोठी खळबळ माजल्याचं दिसून आलं. हा वाद निर्माण झाला तो सॅमसनच्या विकेटवरून. यावेळी सॅमसन आऊट होता की, नॉट आऊट असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. संजूला शतकी खेळी करता आला नाही. आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने 46 बॉल्समध्ये 8 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली. 16व्या ओव्हरमध्ये संजूने आपली विकेट गमावली, त्यानंतर गोंधळ उडाला.
संजूच्या विकेटनंतर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल आणि राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनीही या प्रकरणात उडी घेतल्याचं दिसून आलंय. बघता बघता प्रकरण वाढलं मात्र यावेळी संजूला आऊट करार देण्यात आला. हा राजस्थानच्या टीमसाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि राजस्थानचा पराभव झाला.
सामन्याच्या दुसऱ्या डावातील 16 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने संजू सॅमसनला आऊट करार दिला. मुकेशने संजूकडे बॉल टाकला, त्यावर त्याने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बाऊंड्रीच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या शाई होपने हा कॅच घेतला. होपने घेतलेला कॅच पाहता त्याचा पाय बाऊंड्री लाईनला पाय लागल्याचं दिसून आलं. यानंतर थर्ड अंपायरने होपने घेतलेला कॅच तपासला आणि त्यानंतर संजूला आऊट देण्यात आलं.
The controversial dismissal of Sanju Samson. pic.twitter.com/0pbvbY5Zd1
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2024
Delhi Capitals owner shouting 'out hain, out hain' to Sanju Samson. pic.twitter.com/bUpjspZaN6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2024
दरम्यान हे प्रकरण याठिकाणी संपायचं नाव घेत नव्हतं. थर्ड आऊट दिल्यानंतरही संजू मैदान सोडायला तयार नव्हता. संजूने त्याच्या विकेटबाबत बराच वेळ पंचांशी वादही घातला. संजूलाही रिव्ह्यू घ्यायचा होता, पण हा निर्णय थर्ड अंपायरनेच दिला आहे, असं सांगून अंपायरने त्याला रिव्ह्यू घेण्यापासून रोखलं.
हा वाद केवळ मैदानावरच थांबला नाही तर मैदानाबाहेरही संजूच्या विकेटवरून वाद सुरू झाला. एकीकडे राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट डारेक्टर कुमार संगकारा संतापलेला दिसला. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा मालक पार्थ यांचा अजून एक अवतार चाहत्यांना पहायला मिळाला. पार्थने संजूला स्टँडवरून बाहेर पडण्याचा इशारा केला. शेवटी संजूला अंपायरचा निर्णय मान्य करून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.