हॉकी इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन ओल्टमन्स यांची हकालपट्टी

हॉकी इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची पदावरुन शनिवारी हकालपट्टी करण्यात आलीय. 

Updated: Sep 2, 2017, 04:54 PM IST
हॉकी इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरुन ओल्टमन्स यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची पदावरुन शनिवारी हकालपट्टी करण्यात आलीय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाल्याच्या कारणावरुन त्यांना पदावरुन काढण्यात आलेय.

डेविड जोन हे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. तीन दिवसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ओल्टमन्स यांनी २०१३मध्ये हाय परफॉर्मन्स कोच म्हणून जबाबदारी घेतली होती. त्यानंतर २०१५मध्ये पॉल वेन यांनी राजीनामा दिल्यानंतर ओल्टमन्स यांच्यावर मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपदावर कार्यरत होते.