मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटच्या मैदानात रन आणि रेकॉर्डचा पाऊस पाडणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीही अव्वल क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार विराटनं २०१८ मध्ये १६१ कोटींची कमाई केली आहे. यातले २७ कोटी विराटनं पगार आणि बक्षीसांच्या माध्यमातून कमावले आहेत. तर विराटला जाहिरातींच्या माध्यमातून १३४ कोटींची कमाई झाली आहे. विराट हा पेप्सी, प्यूमा, ऑडी, ओकले आणि उबर या कंपन्यांचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. वर्षाला एवढी कमाई करणारा विराट एकमेव क्रिकेटपटू आहे.
एका रिपोर्टनुसार इन्स्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी विराटला १.२० लाख डॉलर म्हणजेच ८२ लाख रुपये मिळतात.
विराट कोहली भारतीय क्रिकेट टीममध्ये A+ कॅटेगरीमध्ये येणार खेळाडू आहे. त्याला वर्षभरात ७ कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याला मिळणारी प्राइज मनी, आयपीएल सारख्या स्पर्धांमधून देखील वेगळी कमाई होते.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. विराटचा एकूण संपत्ती अनुष्कापेक्षा १७० कोटी जास्त आहे. कोहलीचा नेट वर्थ ३९० कोटी आहे तर विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती ६१० कोटी आहे. अनुष्काची एकूण संपत्ती २२० कोटी आहे. अनुष्काच्या नेटवर्थमध्ये पुढच्या वर्षी ३० टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे.