Team India: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपवर टीम इंडियाने पुन्हा एकदा नाव कोरलं आहे. यावेळी भारताने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला आणि करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र या मोठ्या विजयानंतर टीम इंडिया एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. बार्बाडोसमध्ये वादळ आलं असून त्यामुळे टीम इंडियाचा सदस्य तिथेच अडकले आहे. बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला असून विमानतळही बंद करण्यात आली असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसारस विमानतळ कधी सुरू होणार याची माहिती नव्हती माहीत नाही. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने आपल्या सदस्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला चार्टर्ड फ्लाइटद्वारे भारतात आणण्याची योजना त्यांनी आखल्याची माहिती जय शहा यांनी दिलीये.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, ते स्वतः टीम इंडियाचे खेळाडू आणि भारतीय माध्यमांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना करत आहेत. बीसीसीआय सोमवारी चार्टर्ड विमानाने बार्बाडोस सोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु विमानतळ बंद झाल्यामुळे हा पर्याय उपयोगात येऊ शकला नाही. बोर्ड चार्टर्ड विमाने चालवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात असून बार्बाडोस विमानतळ सुरू होताच टीम अमेरिका किंवा युरोपला रवाना होईल, अशी माहिती जय शहा यांनी दिली.
टीम इंडियाला मंगळवारीही बार्बाडोस सोडणं कठीण आहे कारण त्या ठिकाणी अजूनही वादळाची स्थिती कायम आहे. बीसीसीआय विमानतळ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जय शाह यांनी मीडियाला दिली आहे. विमानतळाचं काम सुरू होताच टीम इंडिया चार्टर्ड विमानाने अमेरिका किंवा युरोपला जाणार आहे. यानंतर टीम इंडिया तिथून भारतात येईल.
वादळ शांत झाल्यानंतर बारबाडोस विमानतळ खुलं करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेश परतण्यसाठी रवाना होईल. 3 जुलैला टीम इंडियाची मायदेशी एन्ट्री होणार आहे. यावेळी भारतात टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.