विराट कोहलीने 'त्या' जाहिरातीचे मानले आभार

अनुष्काच्या पहिल्या भेटीची आठवण 

Updated: Nov 25, 2019, 01:51 PM IST
विराट कोहलीने 'त्या' जाहिरातीचे मानले आभार  title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील 'पावर कपल' आहे. या दोघांची लव्हस्टोरी ही प्रत्येकाला भावणारी असून त्याचा प्रवास अनोखा आहे. जोक, गमती-जमतीने सुरू झालेला प्रवास 2017 च्या डिसेंबर महिन्यात डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत पोहोचला. विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सगळ्या सामन्या मैदानावर पाहायला मिळाली. 

विराट कोहलीने अनुष्कासोबतची पहिली भेट आणि तेव्हांच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. एका शॅम्पूच्या जाहिराती संदर्भात विराट आणि अनुष्काची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतील कोहलीला आवडलेली बाब म्हणजे, अनुष्काने त्याचं खूप चांगल स्वागत करून तिला रिलॅक्स केलं. यामुळे त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाल्याचं विराट सांगतो.

या मुलाखतीच्या निमित्ताने विराट कोहलीने 'त्या' शॅम्पू जाहिरातीचे आभार मानले आहेत. कारण त्यांच्यामुळे विराटला अनुष्का भेटली. मला हसत खेळत काम करायला आवडतं आणि त्या जाहिरातीच्या स्टेजवरील वातावरण देखील तसंच काहीसं होतं. मी पहिल्यांदा अनुष्कासमोर खूप गमतीशीर जोक मारत होतो, असं कोहली सांगतो. 

एवढंच नाही तर विराट आज जे समतुदारपणे वागतोय त्याचं सगळं श्रेय तो अनुष्काला देतो. अनुष्काच्यासोबतीने विराट कोहली आणखी जबाबदार झाल्याचं सांगतो. त्याचप्रमाणे अनुष्काच्या भेटीनंतर त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याचं देखील सांगतो. (हे पण वाचा 'तो जन्मला नव्हता तेव्हाही भारतीय संघ जिंकत होता'

डिसेंबर 2017 मध्ये लग्न करण्याअगोदर कोहली आणि अनुष्का 4 वर्षे एकमेकांसोबत नात्यात होते. आता लग्नानंतर दोघेही मुंबईत राहत आहेत. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अनुष्काचा नंबर लागतो. सध्या अभिनयापासून अनुष्का लांब असली तरीही ती निर्मितीकडे वळली आहे. त्याचप्रमाणे 'Nush'हा अनुष्काचा कपड्यांचा ब्रँड आहे.  सिल्वर स्क्रिन अनुष्का शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत Zero सिनेमात दिसली होती. यश राज बॅनरखाली 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून 2008 मध्ये अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.